ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वाळीव पोलीस ठाण्यासमोर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये 3 चारचारी वाहनं आणि 32 मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. वाळीव पोलीस ठाण्यासमोरील जप्त केलेल्या वाहनांना अचानक रविवारी दुपारी 1 च्या सुमारास ही आग लागली. या आगीचे स्वरुप इतके भीषण होते की ही वाहनं जळून खाक झाली आहेत.
या आगीचा भीषण व्हिडीओ देखील समोर आला आहे.आगीचे लोट यामध्ये वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आग विझवण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेतली होती. याठिकाणी काही पोलिसांच्या गाड्या सुद्धा उभ्या होत्या, मात्र प्रसंगावधान राखत या गाड्यांना वाचवण्यात यश आलं आहे.
आता पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकताच वसई पोलीस ठाण्यातील जप्त केलेली वाहने पोलिसांनी भंगारात विकल्याची माहिती समोर आली होती, अशावेळी ही आग लागली की लावली याचा पोलीस तपास करीत आहेत.






