हरभजनसिंगने दिली सोशल मिडीयावर गुड न्यूज

नवी दिल्ली – टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग व प्रसिद्ध अभिनेत्री गीता बसरा यांनी पुन्हा एकदा गुड न्यूज दिली आहे. गीता ही प्रेग्नेंट असून त्यांनी सोशल मीडिया वरून एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. जुलै महिन्यात त्यांचे दुसरे बाळ जन्माला येणार आहे

हरभजन सिंग व गीता बसरा यांना याआधी एक मुलगी असून तिचे नाव हिनाया हिर असे आहे. गीताने आज त्या तिघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात हिनायाच्या हातात एक टिशर्ट असून त्यावर मोठी बहिण असे लिहिलेले आहे. सोबत कमिंग सून जुलै 2021 अशी छोटीशी पण सूचक कॅप्शन गीताने शेअर केली आहे


आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग याचा संघासोबतचा करार संपला आहे. हरभजननं स्वत: ट्विट करत हा करार संपल्याचं जाहीर केलं होतं. 2018 मध्ये हरभजन व चेन्नई सुपरकिग्जमध्ये तीन वर्षांच्या करार झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here