मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 56 व्या वाढदिवशी त्याला अनेक सेलिब्रेटी आणि चाहते शुभेच्छा देत आहेत. अशातच करीना कपूरने तिचा आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाचा आमिरचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. लांब दाढी, डोक्यावर पगडी, राखाडी कुर्ता आणि चेहऱ्यावर हास्य, आमिरचा लूक एकदम खास वाटत आहे.
फोटो शेअर करताना करीना कपूरने लिहिले आहे की, ‘हॅप्पी बर्थडे माझ्या लाल..तुझ्या सारखा दुसरा कोणीही नाही…या चित्रपटाच्या तू केलेली जादू पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत..’ आमिर आणि करीना तिसऱ्यांदा एकसोबत चित्रपटात दिसणार आहेत. यापूर्वी या दोघांनी 3 इडियट्स आणि तलाश या चित्रपटात एकत्र काम केलं होत.
दरम्यन, ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा 1994 सालच्या रॉबर्ट जेमेकीस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडपटाचा अधिकृत रिमेक आहे. ‘फॉरेस्ट गंप’मध्ये सुपरस्टार टॉम हॅक्स याने मुख्य भूमिका केली असून या सिनेमाला ‘ऑस्कर’सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.






