ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबई अहमदाबाद मार्गावर पालघर येथे केलेल्या कारवाईत एका ट्रकमध्ये 30 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातल्या मौजे वरवाडा गावच्या हद्दीतील हॉटेल स्टार अरोमासमोर हा ट्रक क्रमांक MH- 18- AA- 2771 उभा होता. या ट्रकमधून अवैध मद्यसाठ्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काला मिळाली होती. त्या माहितीवरून या ट्रकची झडती घेण्यात आली.
झडती घेतल्यानंतर ट्रकच्या एका गुप्त कप्प्यात दिव, दमण, दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठी नेण्यात येणारा आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला एकूण 30 लाख 46 हजार 400 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.या प्रकरणी ट्रकचालक राजपाल राजू बामने (28, रा. सेंधवा, बडवाणी, मध्यप्रदेश) याला विदेशी मद्याची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.






