आता गाझियाबादमधील लग्नात थुंकी लावून चपात्या बनवत होता आचारी

नवी दिल्ली – मेरठ मधील एका लग्नसमारंभात थुंकी लावून चपात्या बनवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत थुंकी लावून चपात्या बनवणारा आरोपी सोहेलला अटक केली होती. या घटनेच्या काही दिवसानंतरच आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे.

गाझियाबादमधील एका साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आचारी चक्क थुंकी लावून चपात्या बनवत असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गाझियाबादमधील भोजपूर येथील आहे. 

आचाऱ्याचे नाव मोहम्मद मोहसीन असून तो चपातीच्या पिठाच्या गोळ्यांवर थुंकत असल्याचे दिसत आहे. त्याला कार्यक्रमातील एका व्यक्तीने थुंकताना बघितल्यानंतर त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्याला तेथून हाकलून लावले. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकं भडकली असून त्यांनी त्याच्या अटकेची मागणी केली आहे.


काही दिवसांपूर्वी एकजण लग्नसमारंभासाठी चपात्या बनवण्याचे काम करत होता. तो चपात्या बनवत असताना चपात्यांना थुंकी लावून त्या बनवत होता. हा व्हिडीओ मेरठमधील लग्न समारंभाचा आहे. तो व्हायरल झाल्यावर हिंदू जागरण मंच संस्थेने याचा निषेध करत मेरठच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत थुंकी लावून चपात्या बनवणारा आरोपी सोहेलला अटक केली आहे.
rotimaker-arrested



 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here