औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे मुलीस मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह16 जणांविरुध्द गुन्हा किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, 12 मार्च रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान सरपंच गंगाधर डेपे, उपसरपंच बालाजी आचार्य, ग्रामसेवक, प्रशांत आचार्य, कांचन आचार्य, राहूल कांबळे, गहिनीनाथ आचार्य, सुभाष टेलर, मैनाबाई आचार्य, मैनाबाईचा मुलगा, शिला आचार्य, संतराम ग्रामपंचायत सेवक, भुराबाई आचार्य, शांताबाई आचार्य, सुभाष टेलरची बायको, जेसीबी ऑपरेटर हे सर्वजण फिर्यादीच्या घरासमोर आले. घरासमोरील जागा उकरून साफसफाई करू लागले. तेव्हा पिडीत मुलीने आमची जागा का खराब करताय, तुमच्याकडे कोणाचा आदेश आहे ते मला दाखवा असे सांगितले असता. तुला कसला आदेश दाखवायचा असे म्हणून सरपंच गंगाधर डेपे यांनी तिला हातातील काठीने ढकलून दिले. जेसीबी ने देवीचे मंदिर, मुर्ती, पाटी पाडून टाकली.
फिर्यादीस मारहाण केली. तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.. दगडाने गुप्तांगावर मारून गंभीर जखमी केले. तिचा विनयभंग केला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलीस उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






