पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पाणी आणण्याच्या बहाण्याने दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार देहू येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.आतिश उर्फ बाळा आत्माराम चव्हाण (वय २१, रा. एकता हौसिंग सोसायटी, चव्हाण नगर, देहू ) असे त्याचे नाव आहे.
पीडित मुलीच्या आईने देहूरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या.फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, शनिवारी ( दि. १३) रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान पाणी आणण्यासाठी जाण्याचा बहाणाकरून आतिश चव्हाण हा दहा वर्षीय मुलीला दुचाकीवरून घेऊन गेला. मात्र येथून जवळच असणाऱ्या एका कंपनीच्या मागील बाजूच्या झाडीत नेऊन त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबाबत कोणाला सांगू नको, अशी धमकीही त्याने दिली. पीडित मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आईला घडला प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात चव्हाणविरोधात तक्रार दिली.
लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये संशयित आरोपी आतिश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक के. एन. गावडे करीत आहेत.






