जॅकलीनने शेअर केले टॉपलेस फोटो; चाहत्यांच्या पडल्या उड्या

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडची श्रीलंकन ब्युटी, अशी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ओळख. ती नेहमीच आपल्‍या अदांनी चाहत्यांना घायाळ करते. जॅकलिनने काल रात्री एक टॉपलेस फोटो शेअर केला . ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते तिचे कौतुक करण्यास थकलेले नाहीत.

जॅकलिनने अल्‍पकाळात बाॉलीवूडमध्‍ये भक्कम स्थान निर्माण करण्यात तिला यश मिळाले. रुपेरी पडद्यावर ज्याप्रमाणे जॅकलीनच्या भूमिकांना प्रेक्षक दाद देतात, त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही तिच्या अदांवर चाहते फिदा झाल्‍याची प्रचिती तिने नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टकडे पाहून येत आहे.

काही चाहते म्हणाले , एकदम हॉट. या मोनोक्रोम इंस्टाग्राम फोटोविषयी बोलायचे झाले तर यामध्ये जॅकलीन पलंगावर शर्टलेस पडलेली आहे. तिचा एक डोळा केसांनी झाकलेला दिसत आहे. या फोटोत तिने स्मोकी आय मेकअपने आपला लूक पूर्ण केला. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या हार्टवाल्या कॉमेंट्सचा पाऊस पडला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here