बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे शनिवार रविवार दोन दिवस प्रशासनाने लावलेल्या लॉक डाऊनला बाजार सावंगी परिसरातील बाजार सावंगीत दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून या दोन दिवसाच्या लॉक डाऊनलोड 95 टक्के प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा गंभीर आजार नियंत्रणात आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाने शनिवार-रविवार हे हप्त्यात दोन दिवस लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याने शासनाच्या या निर्णयाला बाजार सावंगी व परिसरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शनिवार-रविवार कडकडीत बंद पाळला यात अत्यावश्यक सेवा असलेले दवाखाने मेडिकल वगळता सर्व दुकाने दोन दिवस बंद होती






