मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या दिग्दर्शनातून तयार होणाऱ्या चित्रपट ‘RRR’ ची चाहते वाट पाहात आहेत. या चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाच्या सर्व अपडेटवर चाहत्यांच्या उड्या पडतात.
या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. तिचा लूक तिच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आला आहे. आलिया या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसेल. लूक रिलीज झाल्यावर लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
या चित्रपटात दक्षिणेतील सुपरस्टार जूनियर NTR आणि राम चरण असे दिग्गज कलाकार आहेत, तर चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही देखील महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
RRR मध्ये आलियाचा फर्स्ट लूक अत्यंत सुंदर आहे. आलियाचा फर्स्ट लूक आल्याबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केवळ 15 मिनिटात 70 हजाराहून अधिकांनी आलियाच्या लूकला लाइक केलं आहे.
लूकवर चर्चा सुरू आहेत. आलिया यामध्ये दाक्षिण्यात्य गेटअप मध्ये खूप सुंदर दिसत आहे. रेड प्रिंटेड ब्लाउज सोबत हिरव्या रंगाची साडी, नाकात छोटीशी रिंग, कपाळावर टिकली, कुरळे केस आणि त्यावर गजरा अशा पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. 13 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
आतापर्यंत रिलीज करण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये NTR आणि राम चरण यांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. राजामौली यांचा हा आगामी चित्रपट एक ‘पीरिएड अॅक्शन ड्रामा’ आहे. ज्याचे प्रोडक्शन डीवीवी दानय्याने केले आहे. फिल्ममध्ये अजय देवगण आणि श्रिया सरन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट गेल्यावर्षीच रिलीज होणार होता. मात्र कोविड19 मुळे शूटिंग आणि अन्य कामे पुढे ढकलण्यात आली होती. यावर्षी 13 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.







