ठाण्यातील तलावपाळी परिसरात महाराष्ट्र पोलिसांना सलाम

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची आणि चातुर्याची गोष्ट सांगणारी मालिका म्हणजेच ‘नवे लक्ष्य’ ही सुरु झाली आहे. या मालिकेच्या निमित्तानं ठाणे तलावपाली परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करुन स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीनं महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा देण्यात आला.

याप्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, खासदार राजन विचारे, स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे, निर्माते आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर आणि नवे लक्ष्य मालिकेची सर्व कलाकार मंडळी हजर होते.

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवी२४ तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here