मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता रणवीर सिंह, अजय देवगण आणि कतरिना कैफ अशी मेगास्टार असलेली बॉलिवूडची फिल्म ‘सूर्यवंशी’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘सूर्यवंशी’ सिनेमा ३० एप्रिल २०२१ दिवशी प्रदर्शित होणार आहे. करण जोहर सह सूर्यवंशीच्या टीमने एक खास व्हिडीओ पोस्ट करत या सिनेमाच्या रिलीज डेटची जाहीर केली आहे. मागील वर्षी सूर्यवंशीचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.
त्यानंतर सिनेमा प्रदर्शित होणं अपेक्षित होते. मात्र कोविड 19 संकटामुळे या सिनेमाच्या रिलीजमध्ये अडथळे आले. मात्र रसिकांना दिलेल्या प्रॉमिसनुसार योग्य वेळ आली की सिनेमा रिलीज होईल हे आम्ही पाळलं आहे आणि सिनेमा ३० एप्रिल २०२१ ला रिलीज होईल असं सांगण्यात आलं आहे. यावेळी चाहत्यांचे आभार देखील मानन्यात आले आहेत.






