अंधेरीच्या रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – रहदारीने भरलेल्या रस्त्यावर धावत असताना अचानकपणे इनोव्हा गाडीने पेट घेतला आणि अंधेरी परिसरात खळबळ माजली. दरम्यान कारमध्ये असणाऱ्या व्यक्तींना आग लागल्यानंतर बाहेर पडण्यास यश मिळालं आहे. यानंतर बराच वेळ गाडी रस्त्यावर पेटत राहिली.

उपस्थितांनी कारला आग लागल्याचे अग्निशमन दलाला कळवले, पण अग्निशमन दलाची गाडी घटनस्थळी पोहोचेपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. गाडीमध्ये आग कशामुळे लागली याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या गाडीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये आगीची भीषणता सर्वांना समजू शकेल.

अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं असलं तरी गाडी जळून खाक झाली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली असावी याचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here