मैत्री तोडल्याच्या रागातून तरुणी व तिच्या आईवर चाकूने वार

knife-attack

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – तरुणीने मैत्री तोडली म्हणून तिच्यासह आईवर एका तरुणाने चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर तरुणाने स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वसई एव्हरशाईन येथे नुकतीच घडली. या प्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ वर्षीय तरुणी आपल्या आईसोबत घरी असताना या तरुणाने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर तरुणाने हा हल्ला केल्यानंतर स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर तरुण हा तरुणीचा मित्र आहे. या तरुणीशी संबंधित हल्लेखोर तरुणाशी मैत्रिचे संबंध होते. मात्र, ते मैत्रिचे संबंध तोडल्यामुळे तरुणाने त्याचा राग मनात ठेऊन तिच्यावर हल्ला चढविला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या हल्ल्यात तरुणी आणि आई दोघीही गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर हल्लेखोराने स्वतः विष प्यायल्याने त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here