मी टू प्रकरणी पाकिस्तानी गायिका मीशा शफीला ३ वर्षांची शिक्षा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री मीशा शफीने काही वर्षांपूर्वी अली जफरवर लैगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर अलीने मीशाविरोधात मानहानीची खटला दाखल केला होता. आता याप्रकरणी मीशाला तीन वर्षांची शिक्षा झाली आहे.

मीशाने ट्विट करून म्हटले होते की, सिने इंडस्ट्रीतील तिचा सहकारी अली जफरने तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले आहे.

तिने ट्विटमध्ये अली जफरचा उल्लेख केल्यानंतर लिहिले होते, ‘मी हे यासाठी शेअर करत आहे की, ‘माझं मत आहे की, लैंगिक शोषणाविरोधात मी आवाज उठवून आपल्‍या समाजात रूजलेली मौन संस्‍कृती तोडू शकेन, यावर इतकं उघडपणे बोलणं खरच सोपे नाही. पण, गप्‍प राहणेदेखील कठीण आहे. माझं मन याला परवानगी नाही देत. मी इंडस्‍ट्रीमध्‍ये माझा सहकारी अल जफरच्‍या लैंगिक शोषणाची बळी ठरले. हे मी दोन मुलांची आई असताना घडलं आहे. ही माझ्‍या कुटुंबासाठी धक्‍कादायक घटना आहे. अलीला मी अनेक वर्षांपासून ओळखत होते. आणि मी त्‍याच्‍यासोबत स्टेजदेखील शेअर केलं आहे. त्‍याने माझ्‍याशी जो व्‍यवहार केला आहे, ते मी अनुभवत आहे. आणि मला माहिती आहे की मी एकटी नाही.’

मीशाने केलेले आरोप अली जफरने नाकारले होते. त्याने मीशाविरोधात मानहानीचा केस दाखल केली होती. अलीच्या या केसवर कोर्टाने निर्णय देत मीशाला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर मीशाने ट्विट केलं की, अशा घटनेत कोणत्या महिलेला न्याय मिळाला आहे? मीडिया रिपोर्टनुसार, मीशा शफीचे वकील या निर्णयाला आव्हान देणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here