मुंबई (प्रमिला जाधव) – गोकुळधाम परिसरातील श्रीगणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यासाठी सहाय्यक आयुक्त पी दक्षिण विभाग श्री.क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन दिले. संपूर्ण मुंबईत कोविड कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझ्या विनंती वरुन गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी १) आरे भास्कर मैदान २) लायन्स क्लब मैदान गोकुळधाम ३)विजय साळसकर उद्यान या पैकी कोणत्याही एका ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करावे.
त्यांनी यासाठी मान्यता देऊन जागेची पाहणी करून गणेश विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव निर्मिती करण्यासाठी तातडीने अधिकारी यांना सुचना दिल्या. कोरोना आजारामुळे 4 फूट गणेशाची मूर्त आणावी असा नियम राज्यशासनाने केला त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो. गणेशोत्सव काळात गणेश भक्तांनी गर्दी करू नये. वारंवार आपले हात सॅनिटायझरने धुवावे. सोशल डिस्टन्स पाळावे असे आवाहन नगरसेविका प्रीति साटम यांनी केले आहे.
Home Uncategorized गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी नगरसेविका प्रिती साटम यांनी केली कृत्रिम तलावाची मागणी







