धरणगाव भारतीय जनता पार्टीकडून शेतकरी जनआंदोलन

धरणगाव (तालुका मीडिया प्रमुख टोनी महाजन) – दिनांक १७ जुलै रोजी धरणगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणगाव तहसीलदार व कृषी अधिकारी धरणगाव यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांनी या निवेदनाची दखल न घेतल्याने, आज (दि.२०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रास्तारोको जनआंदोलन करण्यात आले.
दि. १७ जुलैला निवेदनात १) युरीया तसेच मिश्र रासायनिक खतांचा काळाबाजार व कृत्रिम तुटवडा बंद करा, २) शासकीय ज्वारी, मका, कापूस खरेदी सुरू करून लवकर शेतकऱ्यांचे पैसे अदा करावे, ३) शासकीय दुधाचे खरेदी दर वाढवणे, ४) शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे या प्रमुख मागण्या दोन दिवसात पूर्ण न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देऊन सुद्धा तहसीलदार, कृषी अधिकारी, खत कंपन्या इत्यादी दखल घेतली नाही म्हणून शेतकऱ्यांचे हाल रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीला आज दि.20-07-2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रास्तारोको शेतकरी जनआंदोलन करण्यात आले, यावेळी गटनेते कैलास माळी सर यांनी प्रास्ताविक केले. अॅड.संजय महाजन भाषणात म्हणाले की, हे तिघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, तसेच पी.सी.आबा म्हटले की सरकारने केलेल्या घोषणे प्रमाणे शेतकऱ्यांना बांधावर खते द्या,पालकमंत्री कुठे आहेत,खत न मिळाल्यास पालकमंत्रीना घेराव घालू असा इशारा दिला.सुभाष अण्णा म्हणाले शेतकऱ्यांचे हाल करणाऱ्या तिघाडी सरकारचा निषेध असो,या मतदारसंघाचे मंत्री गुलाबराव पाटील संध्याकाळ च्या कार्यक्रमात मशगुल राहतात त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही परंतु दारु दुकानवाल्याची चिंता आहे, असे आरोप करत शेतकरी बाबत सरकारला जाब विचारण्यात आला. तसेच शेखरदादा मनाले शासन,अधिकारी व खत वितरीत करणारी कंपनी मनमानी कारभार करत असून शेतकऱ्यांचे हाल व नुकसान करत आहे.म्हणून भारतीय जनता पार्टी ने शेतकऱ्यांसाठी निवेदनात म्हटल्याप्रमाणे भाजपाचे आज आंदोलन करण्यात आले
सदर जनआंदोलन प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव,भाजपाचे जेष्ठनेते सुभाष अण्णा पाटील, पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखरदादा अत्तरदे, शिरीषआप्पा बयस, भाजपा तालुकाध्यक्ष संजय महाजन, माजी सभापती पुनीलाल महाजन, अँड.भोलाणे बापु, शेखर पाटील, सुनील वाणी, मधुकर रोकडे, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक शरद अण्णा धनगर, ललित येवले, गुलाब मराठे, भालचंद्र माळी, कडू बयस, दिलीप महाजन, सुनील चौधरी, भास्कर मराठे, प्रल्हाद पाटील, कडू महाजन, कांतीलाल माळी, रामचंद्र मराठे, कन्हैया रायपूरकर, विजय महाजन, मधुकर पाटील, राजु महाजन, सुदाम मराठे, शरद भोई, वासुदेव हरिनाथ महाजन, महेंद्र महाजन, दगा पाटील सचिन पाटील, अमोल महाजन, रविंद्र मराठे, शुभम चौधरी, अनिल बडगुजर, विक्की महाजन, विकास चव्हाण पिंटू कंखरे, विशाल महाजन, अमृत मराठे, सदाशिव महाजन, राजाराम महाजन, रतीलाल महाजन, गुलाब धनगर, राजू धनगर, विशाल मराठे यांच्या सह भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here