भाजपाला धक्का : सीताराम पाटील गायकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व अकोले तालुक्यातील जेष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांनी भाजप ला सोडचिठ्ठी देत आज मुबंई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे , युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, घनश्याम शेलार, आ.डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे , सहकारातील निवृत्त अधिकारी बी जे देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे,शहराध्यक्ष संपतराव नाईकवाडी, आदी उपस्थित होते.

गायकर यांचे बरोबर अगस्ति कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाशराव मालुंजकर,ज्येष्ठ संचालक गुलाबराव शेवाळे,अशोकराव देशमुख, कचरु पाटील शेटे,रामनाथ बापू वाकचौरे,बाळासाहेब ताजने, भास्कर बिन्नर, पं स चे माजी सभापती विठ्ठलराव चासकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, अगस्ति पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर,

अमृतसागर दूध संघाचे संचालक व जनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊपाटील नवले, जि प चे माजी सदस्य कैलासराव शेळके,दूध संघाचे माजी अध्यक्ष प्रतापराव देशमुख,शरदराव चौधरी,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे, शिवसेनेचे माजी पं स सदस्य आप्पासाहेब आवारी, माधवराव भोर,विकासराव शेटे,प्रकाश नाईकवाडी,दत्तात्रय भोईर ,सुधीर शेळके आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here