कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक

नवी दिल्ली – देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात करोनाचा दुसरी लाट आली आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि आता पंजाबमध्येही करोनाचा संसर्ग वाढत आहे. मध्य प्रदेशात राजधानी भोपाळ आणि इंदूरमध्ये बुधवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. तर गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोदा, सूरत आणि राजकोटमध्ये ३१ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पण संचारबंदीचा कालावधी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत आहे. तर पंजाबमधील रुपनगर जिल्ह्यात मंगळवारपासून रात्री ११ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणात करोनाचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत एकूण रुग्णांपैकी २१ हजार रुग्ण हे या आठ राज्यांत आढळून आले आहेत. हा आकडा देशातील ८६.३९ टक्के इतका आहे.

देशातील करोनाची स्थिती आणि लसीकरण मोहीमेाबाबत पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधणार आहेत. करोना व्हायरसचे संकट आल्यापासून पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आले आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी शेवटचा संवाद हा देशात लसीकरण मोहीम सुरू होण्याच्याआधी जानेवारीत झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here