मोरया स्पोर्टस् क्लबतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “श्री शक्ती सन्मान सोहळा” आयोजित

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – मोरया स्पोर्ट्स क्लब, नेरूळ नवी मुंबई आयोजित कबड्डी सामन्याचे आयोजन सेक्टर १८ येथील मैदानावर पार पडला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी समाजसेविका सौ. उल्काताई तिकोणे, सौ. संगिता ताईं पवार व सौ. सुषमा शेवाळे, सौ. अश्विनी मयेकर, सौ. वंदना मदने, सौ. संध्या नाईक व सौ ममता सिंग यांच्या या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हि कबड्डी स्पर्धा स्थानिक मुलींना आरोग्य, शारिरीक सुदृढता व खेळाचे महत्व त्याच बरोबर व महिला खेळाडूंना आपले कबड्डी खेळातील कौशल्य विकसित करणे साठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी श्री. राजुशेठ तिकोणे , श्री. किसन गायकवाड साहेब श्री. भगवान भोर श्री. गोविंद कोरे, श्री. अनिल मयेकर, श्री.राजाराम शिंदे, श्री. अनिल नवले, श्री. अनिल ङावखर, त्याचबरोबर मंडळाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सभासद तरुण मित्र परिवार तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, क्षेत्रात कार्य करणारी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर स्पर्धेत चुरशीचे नेत्रदीपक सामने नेरूळ नगरीतील क्रीडा रसिकांना पहावयस मिळाले.

उत्कृष्ट चढाई म्हणून संजना मोहिते यांची निवड करण्यात आली , उत्कृष्ट पकड म्हणून संगीता बिके यांची निवड करण्यात आली , तर सोनिया चौहान हा संघ सामनावीर ठरला या संघा मध्ये अनुश्री शेवाळे, प्रांजल निघोट, अंजली गुप्ता व पायल धाङवे या खेळाडूंना श्री शक्ती सन्मान देऊन सन्मानीत करण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे सुत्र संचालन स्वप्नील संभाजी दौंड यांनी केले तसेच प्रशांत खांङगे यांनी उपस्थितांचे देणगीदार,हितचिंतक मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here