परिणिती चोप्राने लगावली अर्जुन कपूरच्या कानशीलात

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेता अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांनी ‘इश्कजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दोघांचाही पहिला वहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यानंतर या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आणि आता पुन्हा एकदा ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटातून हे दोघंही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या १९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटाच्या सेटवर शूटिंगच्यावेळी असं काही घडलं की, परिणितीनं अर्जुनच्या कानशीलात लगावली.

‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात परिणिती चोप्रा संदीप कौर आणि अर्जुन कपूर पिंकी दहियाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित आहे. त्यामुळे परिणिती आणि अर्जुन यांच्यातील हिंसा खरीखुरी वाटावी असा चित्रपटाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांनी या दोघांना सांगितलं होतं की, तुम्हाला एकमेकांना खरं खरं मारावं लागेल. त्याशिवाय ते दृश्य खरं वाटणार नाही.

याबाबत अर्जुन कपूर म्हणाला, ‘महिलांसोबत होणाऱ्या हिंसेला मी खरंच खूप गांभीर्यानं घेतो. कारण मी त्या लोकांपैकी आहे जो महिलांच्या सानिध्यातच लहानाचा मोठा झाला आहे. माझ्या मते जेव्हा तुम्ही एखादी भूमिका साकारत असता तेव्हा तुम्हाला तुमचं पर्सनल लाइफ बाजूला ठेवून काम करणं गरजेच असतं. तुम्हाला अशा भूमिकेसाठी साइन करण्यात आलं आहे ज्याप्रकारचे लोक आजही आपल्या समाजत आहेत.’

अर्जुननं सांगितलं, या चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी पुन्हा एकदा परिणितीनं पुन्हा एकदा माझ्या कानशिलात लगावली. पण यावेळी हे जबरदस्तीने करून घेतलेलं नाही. कारण जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तिरेखेकडून काय अपेक्षा आहेत हे समजतं आणि हा सीन स्क्रिप्टची गरज होती. पण मी तिच्यासारखी भूमिका कधीच साकारू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here