मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – कोरोना कोविड – १९ व्हायरसमुळे संपूर्ण देशावर आक्रमण झाले आहे. या लॉकडाऊनमुळे एम / पूर्व आणि कुर्ला विभागातील असंघटित क्षेत्रातील कामगारांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘कोरोना विरुद्ध लढा’ या प्रकल्प अंतर्गत संकल्प संस्था आणि रिनव्हेत इंडिया तसेच मनपसंत लाईफ यांच्या संयुक्तरित्या एल आणि एम पूर्व विभागातील असंघटित क्षेत्रातील कुटुंबातील व्यक्तींना संकल्प संस्थाचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या माध्यमातून मो रफी नगर, शांती नगर, पद्मा नगर, इंद्रा नगर, शिवाजी नगर, गोवंडी आणि आगरकर वाडी मानखुर्द या विभागातील विविध गरजू लोकांना कोलगेट आणि मास्क वाटप करण्यात आले आहेत. तसेच महात्मा फुले लल्लूभाई कंपाऊंड या शाळेतील सातवी ते नववी इयत्ता मधील १६० मुलींना कोलगेट, मास्क आणि सँनिटरी पॅड याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष हिवाळे यांनी यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षिका अक्षरा माने, लक्ष्मी काळे, अंजुम अन्सारी, नसरीन अन्सारी, सायरा शेख, सविता हेंडवे आणि कविता खोमणे या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे ही स्पष्ट केले आहे.







