नाशिकमध्ये आता लग्नावर बंदी, पहा कारण

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – राज्यातील नाशिकमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिकमधील जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून (१७ मार्च) नाशकात एक ही विवाह होणार नाही.

पुढील आदेशापर्यंत नाशकात विवाह सोहळ्यांवर बंदी असणार आहे. शहरात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळतीय. त्यामुळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यानुसार आता शहरात ‘नो शुभमंगल ओन्ली सावधान ‘ असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयापर्यंत ही बंदी असणार आहे.

काल (१६ मार्च) रोजी नाशिकमध्ये १३५४ नव्या रुग्णांची भर पडली असून प्रशासनासमोर एक आव्हान उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here