मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्याच्या पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. सिंग यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. पोलिस आयुक्त असलेले परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकू येत होती. परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या बरोबरच रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलिस पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची दबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना हेमंत नगराळे चर्चेच आले होते. कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना खपत नसत. कठोर निर्णय घेत ते अशा अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, किंव मग बदलीही करत असत. त्यावेळी वाशी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेवरील दरोड्याची उकल नगराळे यांनी अवघ्या दोन दिवसात केली होती. हे प्रकरण देशभर गाजले होते. त्यावेळी नगराळे यांचे सर्वत्र कौतुक झाले होते.
हेमंत नगराळे यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले आहेत. नगराळे यांचा आतापर्यंत राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकाने गौरव करण्यात आला आहे.
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झालेले हेमंत नगराळे हे सन १९८७ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांनी२०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदावर काम केले आहे. पुढे दोन वर्षांनी, सन २०१८ मध्ये त्यांची नागपूरला बदली करण्यात आली होती. मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होत असाना नगराळे पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून काम करत होते. हेमंत नगराळे यांचा १ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.






