मातंग समाज व लहुजी शक्तीसेना मार्फत तहसिलदारांना दिले निवेदन
चोपडा (संदीप ओली) – संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा चोपडा शहरातील मंजूर असलेला पुतळा तात्काळ बसविण्यात यावा.याबाबतचे निवेदन तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित यांना मातंग समाज व लहुजी शक्तीसेना मार्फत देण्यात आले.चोपडा शहरामधे 1992 मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मंजूर झालेला असून नगरपालिकेने सदर पुतळा खरेदी देखील केलेला आहे,खरेदी करून 28 वर्ष लोटले आहेत . महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराजी महाराजांचा पोवाडा सातासमुद्रापलीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गायला असून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “फकीरा”ही कादंबरी अर्पण केली आहे,जगातील सत्ताविस देशांमधे अनेक भाषांमध्ये त्यांचे साहित्य अभ्यासले जाते.अशा थोर महापुरुषांचा पुतळा लवकर बसविण्यात यावा याकडे नगरपालिकेने विशेष लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.होत.सदर पुतळा बसविण्याची जागा देखील नियोजित आहे तरी न.पा.मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष घालून मातंग समाजाला न्याय द्यावा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुतळा बसवुन मातंग समाजाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.जर या जन्मशताब्दी वर्षी देखील पुतळा बसवण्यात आला नाही तर नगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाच्या वेळेस काही झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका प्रशासन राहील अशा प्रकारच्या इशारा देखील देण्यात आलेला आहे.निवेदन देतेवेळी जयवंत तायडे,गणेश निकाळजे,नागेश निकाळजे, सागर पाचोणे,संदीप निकाळजे, अविनाश पाचोणे,दिपक थोरात, आकाश सोनवणे, किरण शिरसाट यासह इ.कार्यकर्ते उपस्थित होते.







