श्रीमती लिलाबाई छगनराव सानप उपसरपंच भर जहागीर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र नियामक मंडळाच्यासदस्यपदी निवड

पुणे (पंढरी गायकवाड) – भारतीय संस्कृतीत महिलांना पूर्वी चूल आणि मूल याशिवाय दुसरं काही माहिती नव्हतं, घर संसारात ,आणि कामाच्या व्यतिरिक्त बाहेरच जग माहिती नाही, महिलांना अनेकदा सुख सुविधांपासून लांब ठेवण्यात आले, बाहेरील जगाचा अभ्यास महिलांना मुळीच नसायचा, शिक्षण क्षेत्रात किंचित महिला आघाडीवर असायच्या, परंतु कालांतराने महिला ना शिकण्याची जिद्द होती,राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशी ची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, अश्या अनेक महान स्त्रियांनि महिलांना सन्मान दिला शिक्षण दिले,जस जसा काळ बदलला त्याप्रमाणे महिलांची शिक्षण व सामाजिक क्षेत्रात संख्या वाढत गेली, महिलांना प्राधान्य देण्यात आले, अनेक पद ,प्रतिष्ठा मिळवून सन्मान देण्यात आला, महिला आज जगाच्या पाठीवर चंद्रावर सुद्धा पोहचल्या ,महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आरक्षण मिळाले व महिला ही व्यक्ती जागाच भवितव्य सांभाळू शकते हे सिद्ध केले, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी बरोबरीने काम करण्यास सुरुवात केली, अश्यातच वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका मधिल
मोप प्राथमिक आरोग्य केंद्र नियामक मंडळ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्य सौ उषाबाई माणिकराव गरकळ यांच्या माध्यमातून श्रीमती लिलाबाई छगनराव सानप, उपसरपंच भर जहागीर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र नियामक मंडळाच्यासदस्यपदी निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदल त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे, अनेक शुभेच्छांचा वर्षांव केला जात आहे त्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळते, खरोखरच स्त्रियांना सन्मान देणे हा महाराष्ट्र संस्कृती आणि देशाच्या संस्कृती ला आपल्या पावन भूमीतील महान थोर पुरुषांच्या पुण्याईने शक्य झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here