जुन्नर (सौरभ चौधरी) – नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटामध्ये सोमवार दि.२० रोजी मारुती स्वीफ डिझायर व इतर वाहनांवर दरड कोसळण्याची घटना घडली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.मारुती कार मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून इतर वाहनांचे ही नुकसान झाले.महामार्ग पोलीस व टोकावडे पोलिसांना माहिती समजताच जागेवर हजर झाले असून कोसळलेली दरड हलवण्यात यश आले आहे.महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.सध्या माळशेज घाटामध्ये पाऊस सुरू असून पावसाळ्यामध्ये दरवर्षीच दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. कोरोना विषाणूचे संकट असल्या मुळे माळशेज घाट वर्षा विहारासाठी बंद करण्यात आलेला आहे .







