नाशिक (विशेष प्रतिनिधी) – त्रिमुर्ती चौकातील एका पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विस वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेबाबत अंबड पोलीसानी दिलेल्या माहिती नुसार, कृष्णा उर्फ बाळा अशोक शिंदे ( २०, रा. त्रिमुर्ती चौक ,नवीन नाशिक ) या नराधम युवकाने पिडीतेच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेत स्वतःच्या घरात बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
याप्रकरणी अंबड पोलिसांनी नराधम युवकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत.






