नाशिक (विशेष प्रतिनिधी) – पंचवटी परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पंचवटी पोलिसांची जोरदार मोहीम सुरु केली आहे.
पंचवटी पोलीस आणि महापालिका पंचवटी विभाग यांची संयुक्त विद्यमाने मोहीम सुरू असून यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पकडून प्रत्येकी 200 रुपये दंड आणि त्यानंतर इंदिरा गांधी रुग्णालयात सर्वांची कोविड 90 ची तपासणी करून खातरजमा झाल्यानंतर सोडण्यात येत आहे.
मोहिमेत वरिष्ठ सहायक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव, पोलीस निरीक्षक अशोक भगत, पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे यांचेसह कर्मचारी उपस्थित आहे.






