सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज : नवा कामगार कायदा करणार पगारात वाढ!

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) -देशातील लक्षावधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह पगारातही भरमसाठ वाढ होणार आहे. कोरोना महामारीमुळे जानेवारी ते जुलै २०२० आणि जुलै ते डिसेंबरपर्यंत त्यांना ७ टक्के महाभाई भत्त्यात देण्यात आला नाही. मात्र, आता जानेवारी ते जुलैपर्यंतच्या महागाई भत्ता जाहीर होणार आहे. साधारपणे ४ टक्के महागाई भत्ता असणार आहे.

पगारावर होणार हा परिणाम
सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारावरही त्याचा परिणाम होणार आहे. नियमानुसार बेसिक पगाराला अनुसरुन पीएफ आणि ग्रॅज्युएटी कट होते. तसेच, नवीन पगार कोडनुसार सीटीसीमध्ये मूळ पगार ५० टक्क्यापेक्षा कमी नसली पाहिजे.
पेन्शन धारकांना होणार हा फायदा!महागाई भत्ता वाढणार असल्यानं सर्वच पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे. डीएमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, पेन्शनर्संना १० हजारऐवजी १६ हजार रुपये पेन्शन दर महिन्याला मिळणार आहे.

महागाई भत्त्यात होणार इतकी वाढ
नवीन कामगार कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात फरक पडणार आहे. सद्यस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना १७ टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. जुलै २०१९ पासून याच दराने डीए मिळत आहे. जानेवारी २०२० मध्ये नवीन डीए लागू करण्यात येणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ पर्यंतचा डीए रद्द करण्यात आला.

आता मिळणार हा फायदा
आता, वाढीव महागाई भत्त्यानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना २१ टक्यांपर्यंत डीए मिळणार आहे. कोरोनामुळे रखडलेला निर्णय आता सरकार घेण्याच्या तयारीत असल्याने, १ जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here