जळगाव महापालिकेत सत्तांतर; महापौरपदी जयश्री महाजन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज ऑनलाईन मतदान झाल्यानंतर जळगाव महापालिकेत सत्तांतर झाले असून, निवडणुकीनंतर एकहाती सत्‍ता मिळविणाऱ्या भाजपचेच नगरसेवक फुटल्‍यानंतर अवघ्‍या अडीच वर्षानंतर पुन्हा सत्‍तांतर घडले आहे. भाजपच्या बहुमताला धोबीपछाड देत शिवसेनेने महापालिकेची सत्‍ता काबीज करत महापालिकेवर भगवा फडकाविला आहे.

जळगाव महापालिकेच्या महापौर निवडीच्‍या अनुषंगाने गेल्‍या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकिय उलथापालथ झाली. शिवसेनेची पुरेशी सदस्‍य संख्या नसताना देखील भाजपचे फुटलेले ३१ आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांच्या मदतीने जळगाव महापालिकेवर भगवा फडकला आहे. आज झालेल्या निवडीत महापौरपदी जयश्री महाजन यांची तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडीबद्दल असलेला आत्मविश्वास दिसून येत होता. महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवड प्रक्रिया सुरू असतांनाच महानगरपालिकेवर भगवा फडकल्याचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here