गणेश माने देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अक्कलकोट-तडमुड (प्रतिनिधी) – जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी आज रोजी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी खासदार हुसेन दलवाई,आमदार प्रणिती शिंदे, धवलसिंह मोहिते पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.

गणेश माने देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उभारणीसाठी प्रचंड मोठा फायदा होणार आहे.सहकार क्षेत्रात जयहिंद परिवाराच्या यशस्वी वाटचालीत गणेश माने देशमुख यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांच्यामूळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल असा विचार राजकीय वर्तुळातुन व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here