नवनिर्वाचित जळगाव महापौर सौ जयश्री महाजन व उपमहापौर पदी कुलभूषण पाटील यांचे पालकमंत्र्यांकडून अभिनंदन

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव महानगर पालिकेचा झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गटनेते डॉ सुनील महाजन यांच्या धर्मपत्नी सौ जयश्री महाजन यांची महापौरपदी तर कुलभूषण पाटील यांची उपमहापौर पदी निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,श्यामभाऊ कोगटा,महिला जिल्हाध्यक्ष सौ महानंदा पाटील,युवा सेना प्रमुख शिवराज पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, विष्णूभाऊ भंगाळे, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, नितीन लढ्ढा, सुनील महाजन, किशोर भोसले, सुनिल जगताप, राजुसेठ अडवाणी आदी होते.

या प्रसंगी शोभाताई चौधरी,मंगला बारी,ज्योती शिवदे,विमल वाणी,मनीषा पाटील,नीलूताई इंगळे,प्रशांत चौधरी,स्वप्नील परदेशी,जळगाव जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी,युवा सेनेचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. महापौर यांना 45 तर उपमहापौर यांनाही 45 मते मिळाली न.पा.चे 27 नगरसेवक तर एम आय एम चे 3 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here