भोपाळ (मध्यप्रदेश) – करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे आता कोरोनाला आवरण्यासाठी कठोर निर्बंध घातले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कडक नियम तयार करण्यात आले आहेत, काही ठिकाणी नाईट कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. दरम्यान आता महाराष्ट्राजवळील राज्यांनीदेखील खबरदारी घ्यायाला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतो आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रात येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद ठेवली जाणार आहे. 20 मार्चपासून बससेवा बंद होईल. त्यामुळे या दोन्ही राज्यात जाता येता येणार नाही.
फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा आलेख वेगाने वाढतो आहे. गुरुवारी या संख्येने कहर केला आणि महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही मागे टाकलं. गेल्या 24 तासांत राज्यात 25833 नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.






