जिल्ह्यात कोरोनाने आठ हजारांचा टप्पा ओलांडला; आज आढळले २०८ कोरोना बाधित

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबचा आज (दि.२०) अहवाल प्राप्त झाल्यानंतर नव्याने 208 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. कोरोनाने आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या 8004 झाली आहे. सर्वाधिक 68 कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात सोमवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 68, जळगाव ग्रामीण 4, भुसावळ 10, अमळनेर 34, पाचोरा 8, भडगाव 6, धरणगाव 3, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 23, रावेर 1, पारोळा 28, चाळीसगाव 11, मुक्ताईनगर 1 अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 9 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रावेर तालुक्यात प्रत्येकी 3 तर जळगाव शहर, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी 2, यावल व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here