धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) – शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी रविवारी (दि.१९) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून, जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत त्यांना अवगत करुन दिले.
जनसामान्यांची कणव असणारे गुलाबराव वाघ यांनी सद्यस्थिती मांडताना, सर्वात महत्त्वाची समस्या मांडली ती म्हणजे शेतकरी बांधवांची समस्या मांडली. शेतकरी बांधवांकडे अजूनपावेतो मका, ज्वारी पडून आहेच आणि जिल्ह्यातील शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी कणखरपणे उभी आहे, त्यासाठी योग्य ते कार्य सुरु असल्याचे सांगितले. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना किती मिळाले याबाबतही सांगून त्यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वासही व्यक्त केला. या कार्यासाठी आम्हाला पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Home Uncategorized शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद







