चोपडा तालुक्यात आज आढळले २६ कोरोना बाधित

चोपडा (संदीप ओली) – आज (दि.२०) प्राप्त झालेल्या 52 अहवालापैकी 26 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्यात 25 चोपडा तालुक्यातील तर 1 धरणगाव येथील आहे.चोपडा तालुक्यात शहरातील 12 व ग्रामीण भागातील 13 असे एकूण 25 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्यामधे शहरातील सुदर्शन कॉलनीतील 4, महावीर नगर 6,त्र्यंबक नगर 1व बोरोले नगर 1 येथील 1 तसेच ग्रामीण भागातील अडावद येथे 10,विरवाडे,चुंचाळे व वर्डी येथे प्रत्येकी 1 असे एकूण 25 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या 567 झाली आहे.त्यापैकी 371 रुग्ण बरे झाले आहे व 27 मृत झाले आहेत.आज आलेल्या 25 पॉजिटिव्ह मधील 22 अगोदर पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील किंवा संपर्कातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here