धरणगाव (योगेश पी पाटील) – धरणगांव येथिल कोविड सेंटरला २२ रुग्ण बरे होवुन घरी परतले त्यांचे स्वागत करण्यात आले…
येथिल कोविड सेंटर ला आज दि.२० जुलै रोजी २२ रुग्णांनी करोना वर मात करुन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.त्या सर्वांचे पेढा गुलाबपुष्प देवुन व टाळ्या वाजवुन स्वागत करण्यात आले.तेथील रुग्ण चिंतामण चौधरी.,व चेतन जाधव यांनी धरणगाव कोविड सेंटर ला अत्यंत चांगली सुविधा मिळत असल्याचे बोलतांना सांगुन समाधान व्यक्त केले.
धरणगाव कोविड केअर सेंटर येथे २२ रुग्णांनी यशस्वीपणे मात केली.त्यांचे शासकीय समन्वय समिति अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख जळगांव गुलाबराव वाघ.,तसेच नगराध्यक्ष निलेश चौधरी.,प्रांताधिकारी विनय गोसावी व तहसिलदार नितीन कुमार देवरे यांनी त्यांचे पेढा गुलाबपुष्प देवुन कौतुक केले…
सध्या 82 रुग्ण ऍक्टिव्ह त्यात तालुक्यात 52 शहरात 30 प्रलंबित तालुक्यात एकूण 97 आतापर्यंत बरे झालेले 244 तालुक्यात शहरात 135 ग्रामीणमध्ये 109
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा शासकीय समन्वय समिती अध्यक्ष मा.गुलाबरावजी वाघ., लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी.,उपनगराध्यक्ष विलास महाजन., व प्रांताधिकारी विनय गोसावी., तहसिलदार नितिनकुमार देवरे.,शिवसेनेचे गटनेते पप्पु भावे.,भाजपा गटनेते कैलास माळी सर.,शिवसेना शहर संघटक धिरेंद्र पुरभे आदी उपस्तिथ होते.
कोविड सेंटर ची सक्षमपणे जबाबदारी संभाळणारे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांचा वाणी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी महेश अमृतकर(लक्ष्मी मेडिकल).,ललित येवले.,सुधाकर वाणी, डॉ.पंकज अमृतकर.,डॉ.मनोज अमृतकर.,प्रतिक अमृतकर आदी वाणी समाजाचे मान्यवर उपस्थित होते. तसेच धरणगांव मंडळ अधिकारी वनराज पाटील , तलाठी अनिल सुरवाडे ,कोतवाल तबरेज खाटीक.,अरविंद चौधरी., गोपाल पाटील.,गोपाल चौधरी.,निनाद कापुरे.,अमोल चौधरी आदी उपस्थित होते.







