नवी दिल्ली – देशात कोरोना महामारी पुन्हा वाढत आहे. या स्थितीत गेले अनेक महिने केंद्राचे अन्याय कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली सीमेवर धरणे धरलेल्या शेतकऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधक लस द्या, अशी मागणी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे त्यासंदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. जे लोक आंदोलनस्थळी बसले आहेत त्यांनादेखील व्हॅक्सिन दिली गेली पाहिजे. मी स्वतःदेखील व्हॅक्सिन घेणार आहे, असेही टिकेत म्हणाले.






