मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत आहे. सामान्य नागरिकांना लसीकरणाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते परंतु राजकारणी नेत्यांमध्ये कोरोना लस घेण्याची चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील जे.जे रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेत ट्विटरद्वारे माहिती दिली. तसेच फडणवीस यांनी सर्व पात्र लोकांना पुढे येऊन कोरोना लस घेण्याचे आवाहन केले. यातच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जे.जे रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
जे जे रुग्णालयात जाऊन आज मी कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतला.
हे वॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, ही माझी सर्वांना विनंती आहे.#COVID19Vaccination #COVID19 pic.twitter.com/IVEPwRwdrT— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 19, 2021






