अजून एका बॉलिवूड कपलकडे कोणीतरी येणार येणार गं…

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – अनेक बॉलीवूडकरांच्या घरी २०२१ च्या नव्या वर्षात छोट्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला. त्यानंतर कॉमेडीयन कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. तसेच अभिनेत्री करीना कपूर खानने देखील मुलाला जन्म दिला.

यातच आता एका नव्या जोडप्याच्या घरी सुद्धा नव्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आयुषमान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना लवकरच बाबा होणार आहे. अपारशक्ति आणि त्याची पत्नी आकृती लवकरच चाहत्यांना गूड न्यूज देणार आहेत. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दोघांचेही कुटुंबीय सध्या आनंदी आहेत.

२०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘दंगल’ चित्रपटानंतर अपारशक्तीला ओळख मिळाली आणि त्यांनतर बॉलीवूडमधील अनेक चित्रपटात त्यांनी कामे केली जसे ‘बद्रीनाथ कि दुल्हनिया,’ ‘स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here