दिल्ली पोलिसांनी केला ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी देहविक्रीसाठी तरुणींना फाइव्ह स्टार हॉटेलात पाठवायचे. एका मुलीच्या अपहरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास करून या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश करून दोन तरुणींसह चार जणांना अटक केली. त्यांच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. पोलीस आता या रॅकेटच्या दुष्कृत्यांचा आणि नेटवर्कचा भंडाफोड करणार आहेत.

दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात या कारवाईला सुरुवात झाली. दिल्ली पोलिसांना २२ जानेवारी २०२१ रोजी एका मुलीच्या अपहरणाची तक्रार मिळाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारले. खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी परिसरात छापे मारले. तेथून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली.

या प्रकरणाचा तपास केला असता, सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. मुलीच्या अपहरणाचा संबंध ऑनलाइन सेक्स रॅकेटशी असल्याची माहिती तपासात उघड झाली. सुटका केलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले की, तिचे अपहरण झाले होते. ती जवळच्या एका दुकानात खाऊ आणायला गेली होती. तिथे दोन जण आले. त्यांनी बर्थडे केक कापायचे असल्याचे सांगून तिला घेऊन गेले. केक खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला घेऊन गेले. ऑनलाइन सेक्स रॅकेटची संबंधित टोळीतील अन्य सदस्यांच्या हवाली केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संजय, अंशू, कनिका रॉय, सपना गोयल यांना अटक केली. संजय आणि कनिका हे दोघे दिल्लीतील रहिवासी आहेत. तर सपना आणि अंशू शर्मा हे उत्तर प्रदेशातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here