‘एफआयएएफ पुरस्कार’ मिळवणारे महानायक अमिताभ बच्चन ठरले पहिले भारतीय

मुंबई प्रतिनिधी (रक्षा गोराटे) – बिग बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह अवॉर्ड्स २०२१ देण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात अमिताभ यांना हा सन्मान हॉलिवूड चित्रपट निर्माते मार्टिन स्कोर्सेसे आणि क्रिस्टोफर नोलन यांच्याकडून मिळाला.

अमिताभ बच्चन हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. अमिताभ यांच्यापूर्वी हा सन्मान कोणालाही मिळालेला नाही. एफआयएएफ कार्यक्रमात दरवर्षी चित्रपटाच्या जगाशी संबंधित लोकांचा सन्मान केला जातो. अमिताभ बच्चन यांनी आपले काही छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तसेच याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here