सोनू सूदला स्पाइसजेटने केले सन्मानित

मुंबई प्रतिनिधी (रक्षा गोराटे) – अभिनेता सोनू सूदने लोकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणावरती गरजूना मदत केली होती. त्यामुळे भारतातील लोकांनी त्याला ‘खरा नायक’ म्हणून घोषित केले होते.

राज्य सरकारकडून परवानगी घेतल्यानंतर सूदने संबंधित प्रवासी कामगारांसाठी विशेष बसेसची व्यवस्था केली होती. परप्रांतीय कामगारांना घरी पाठवण्याव्यतिरिक्त सोनू सूद याने अन्नदानाचा उपक्रम देखील सुरू केला होता आणि पंजाबमधील डॉक्टरांना १५०० पीपीई किट्सचे दान केले. सोनू सूदच्या या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी स्पाइसजेटने एक विशेष प्रवासी विमान त्याला समर्पित केले आहे. स्पाइसजेटने अनावरण केलेल्या बोईंग ७३७ या विमानावर अभिनेत्याचे छायाचित्र देखील लावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here