खा.डॉ.हिना गावित यांना सलग पाचव्यांदा संसद रत्न पुरस्कार

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हिना विजयकुमार गावित यांना आज दि. २० मार्च २०२१ रोजी प्राईम पॉईंट फाऊडेशन यांच्या वतीने नवी दिल्ली येथे सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम संसदरत्न पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष तथा केंद्रिय संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल अरोरा, सर्वोच्च न्यायालयाचे पुर्व न्यायाधिक्ष ए.के.पटनायक तसेच प्राईम पॉईंट फाऊडेशनचे चेअरमन व संसदरत्न ऍवार्ड कमिटी अध्यक्ष के.श्रीनावसन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

त्यानिमित्त नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीतर्फे फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे श्रीमती सविता जयस्वाल, श्रीमती सपना अग्रवाल, जवाहरभाई जैन, मोहन खानवाणी, संजीव शाह, सुभाष पानपाटील, मिलींद मोहिते, गोपी उत्तमाणी, दुर्गेश राठोड, जयेश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here