राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई प्रतिनिधी (रक्षा गोराटे) – राज्यात कोरोना रुग्नांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विट करत ही बातमी दिली आहे.

Aditya-Thackeray-twite

 

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. नागरिकांनी कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. आतापर्यंत अनेक मोठमोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here