जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शुक्रवारी अरुनाई बहुउद्देशीय संस्था संचलित शिवन्या ब्युटी इन्स्टिट्यूट ॲकेडमीकडून मुली व महिलांसाठी मोफत ब्यूर्टीपार्लर सेमिनार बेंडाळे कॉलेज समोर घेण्यात आले.
याप्रसंगी नाशिकच्या मेकअप आर्टिस्ट cidesko झालेल्या डॉ, वैशाली शिरसाठ उपस्थित होत्या, त्यांनी सर्व मुली व महिलांना ब्युटी पार्लर भविष्यात किती महत्त्वाचे आहे याची माहिती दिली,, त्याप्रसंगी ब्युटी इन्स्टिट्यूटचे संचालिका उपस्थित होत्या, तसेच मेकअप आर्टिस्ट रोहिणी कोळी, हर्षाली पाटील, विद्या गायकवाड यांची उपस्थिती लाभली.
शुभारंभानिमित्त शिवण क्लास, ब्युटी पार्लर टीचर ट्रेनिंग कोर्स या कोर्सेसमध्ये होतकरू व गरजू महिलांना पन्नास टक्के डिस्काउंट देण्याचे संचालिका यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. तसेच हे कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना रोजगारदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.






