नवी दिल्ली – जगभरामध्ये कोरोनाने काही देशात पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. याचदरम्यान एक महत्त्वाची बाब म्हणजे, चीनी लस घेऊनसुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी देण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान घरातच क्वारंटाइन झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी चीन निर्मित साइनोवॅक कोविड लसीचा पहिला डोस घेतला होता. यावेळी त्यांनी आपल्या देशातील लोकांना महासाथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, “देशात आतापर्यंत ६ ल्खांहून अधिक नागरिक संक्रमित झाले आहेत. गेल्या २४ तासात ४० रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत येथे मृतांचा आकडा १३,७९९ पर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानचा संक्रमण दर वाढून ९.४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.”






