ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला, तिथेच शनिवारी सकाळी आणखी एक मृतदेह आढळला आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे हा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याच परिसरात ५ मार्चला मनसुख हिरेन यांचादेखील मृतदेह आढळून आला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव शेख सलीम अब्दुल असे आहे.
अंबानी स्फोटक प्रकरणात गाडी मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच स्वरूप आले. आता आणखी एक मृतदेह सापडल्याने चर्चेला उद्धन आले आहे. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याच ठिकाणी सकाळी काम करणाऱ्या मजुरांना अजून एक मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना संपर्क साधला.






