पालघर (प्रतिनिधी अजय कल्याणे) – जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रमशाळा सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहेत . जव्हार , पालघर नंतर आता मोखाड्यातील कारेगाव येथील आश्रम शाळेत 13 विद्यार्थी आणि एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याच समोर आलं आहे .
यापूर्वी जव्हार मधील हिरडापाडा या आश्रमशाळेत 37 विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती . तर मागील आठवड्यात पालघर मधील नंडोरे येथील आश्रम शाळेत देखील 30 विद्यार्थ्यांना कोरोना ची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्या नंतर खडबडून जाग्या झालेल्या जिल्हा प्रशासनाने निवासी आश्रमशाळा , शासकीय – खाजगी वस्तीगृह पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 
आश्रमशाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असताना जिल्हा प्रशासनाकडून फारशा उपाययोजना होताना दिसत नाहीयेत . त्यामुळे आदिवासी बहुल असलेल्या दुर्गम भागात देखील आता कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.







